तुमच्या शाळेत “आहाराचे महत्त्व” समजवण्यासाठी आहार तज्ज्ञांना आमंत्रणाचे पत्र
श्री
२० ऑगस्ट २०२१
प्रति
श्रीमती. सुजाता जोशी
आहार तज्ज्ञ,
पुणे
विषय: "आहाराचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रण.
महोदया,
मी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेत पुढील आठवड्यात "आरोग्य सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना योग्य आहाराचे महत्त्व समजावे यासाठी आम्ही एका विशेष सत्राचे आयोजन केले आहे. या सत्रात आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा आहे.
आपल्या वेळेनुसार आपण केव्हा येऊ शकता हे कृपया कळवावे.
आपला नम्र,
सुयश पाटील
विद्यार्थी प्रतिनिधी
